शेतीच्या वादातून तरुणाची आत्महत्या.


 श्रीरामपूर :राहता तालुक्यातील अस्तगाव येथील राहुल सुभाष सापते याने शेत जमिनीच्या वादातून श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी रेल्वे चौकी जवळ रेल्वे खाली आत्महत्या केली, आत्महत्या पूर्वी त्याने  चुलत भावाला फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली व आरोपीचे नावही त्याने सांगितले मात्र पोलिसांनी आरोपी निष्पन्न असतानाही अद्याप कसलीही कारवाई केली नसल्याचे समजते.

याबाबत मयत राहुल सापते याचा चुलत भाऊ भारत चांगदेव सापते यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की, राहुल हा शेती व्यवसाय करत होता गेल्या तीन वर्षापासून त्यांचे व अजय उर्फ गौरव भास्कर कांदळकर यांचे शेत जमिनीवरून वाद चालू आहेत, याबाबत गावातील प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता ,मात्र अजय कांदळकर याने राहुल यास म्हणाला की तू जिवंत असेपर्यंत आपले वाद मिटणार नाहीत ,तू कुठेतरी जाऊन जीव दे त्यानंतर राहुल याने फोन करून आपला चुलत भाऊ भारत सापते यास आत्महत्या करणे करत असल्याबाबत कळवले याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसात दिले आहे. शहर पोलिसांनी आत्महत्या  करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपी निष्पन्न असतानाही काल दि 12 सप्टेंबर रात्री उशिरापर्यंत आरोपीविरुद्ध कसलेही कारवाई केली नाही.

..आणि भाऊ हॅलो, हॅलो.. म्हणत राहिला

राहुलने आत्महत्या करताना शेवटच्या क्षणी चुलत भावाला फोन केला. कुणामुळे आत्महत्या करतो ते सांगितले. तेवढ्यात फोनवर रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आला राहुल कायमचा स्तब्ध झाला आणि भाऊ समोरून हॅलो हॅलो म्हणत राहिला. हे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडिया व्हायरल झाले आहे. राहुलच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या