ले. जनरल अनिल चौहान CDS पदी नियुक्त.

 



जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर नऊ महिन्यांनंतर सरकारने बुधवारी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. चौहान हे भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. 

अनिल चौहान हे देशाच्या लष्कराच्या DGMAO चे पूर्व कमानचे कमांडर राहिले आहेत. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सीडीएसचे लष्करी पद रिक्त झाले होते.लेफ्टनंट जनरल चौहान हे मे 2021 मध्ये ईस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले असून, त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील दहशतवादाविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे.

सन 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन CDS नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर देशाच्या तिन्ही सैन्यात समन्वयासाठी जनरल बिपिन रावत यांची प्रथम सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूमधील खराब हवामानामुळे हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरला कुन्नूर जंगलात अपघात झाला होता. यात सीडीएस बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या