भाजपचे बीड शहराध्यक्ष बियाणी यांची गोळी झाडून आत्महत्या

 भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या 



बीड : 


बीडमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे.भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज दुपारी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून हत्या केल्या. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बियाणी यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

बियाणीचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने बियाणी यांच्या घरी धाव घेतली.
 घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी बियाणी यांच्या घराची पाहणी केली.

घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, स्वत: वर गोळी झाडून बियाणी यांनी आत्महत्या का केली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही.
 घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात धाव घेतली. कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. बियाणी यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या