ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिली.

 



 राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये काल पार पडलेल्या १०७९ ग्रामपंचायतींचे आज निकाल जाहीर झाले आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेली, हे स्पष्ट झाले असून, भाजपच्या ताब्यात ३९७ , राष्ट्रवादीच्या ताब्यात ९८ ,शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात ८७, काँग्रेसच्या ताब्यात १०४ , शिंदे गटाच्या ८१ ताब्यात येवढ्या ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर अपक्षांचा देखील बोलबाला पाहिला मिळाला आहे. अपक्षांच्या ताब्यात २०० ग्रामपंचायती आहेत. तर भाजपने बाजी मारल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची ताकद असल्याचं दिसून आलं आहे. एकूण 24 ग्रामपंचायतींमध्ये उद्धव ठाकरे गटाची सत्ता आली आहे. तर शिंदे गटाला फक्त 7 ग्रांमपंतायतींमध्ये यश आलं आहे. मात्र राष्ट्रवादीला या निवडणूकीत ९८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नेते प्रफुल पटेल यांना धक्का बसला आहे. गोंदियात राष्ट्रवादीला एकाही ग्रामपंचायतीवर जिंकता आलेलं नाही. त्यामुळे गोंदियात त्यांचा सुपडा साफ झाल्याचं दिसून आलं. पाचपैकी चार ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी काँग्रेसने यश मिळवलं आहे. 

शिंदे गटाला मिळालेल्या जागांवरून पुढील चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी पेक्षा जास्त जागा शिंदे गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे दिसून येतं. तसेच राज्यातील अनेक दिग्जांना देखील धक्का बसला आहे. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दिपक केसरकर यांच्या ताब्यात असलेली पाट्ये पुनर्वसन ग्रामपंचायत भाजपकडे गेल्याने यांचा सुफडा साफ झाला आहे. केसरकरांच्या मतदारसंघात शिंदेगटाला एकही ग्रामपंचायत राखता आलेली नाही.  त्यामुळे युती फक्त सरकार पुरतीच आहे. का? असा सवाला लोक विचारू लागले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या