या प्रश्नावर पाकिस्तान निशब्द..



 नवी दिल्ली : पाकिस्तानात दडून बसलेले अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांना भारताकडे कधी सोपविणार ? या प्रश्नावर पाकिस्तानची बोलतीच बंद झाल्याचे दृश्य आज पहायला मिळाले. इंटरपोलच्या जागतिक संमेलनात सहभागी झालेले पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक मोहसिन बट यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देण्यास टाळाटाळ करताना, नो कॉमेंट असे उत्तर देताना बट यांचा एकूणातील अविर्भाव हा ‘तोंड लपविण्याचा‘ असल्याचे एएनआयच्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

दिल्लीत सुरू झालेल्या इंटरपोलच्या या जागतिक बैठकीत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाच्या सहभागाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत परिस्थिती स्पष्ट झाली नव्हती. बट यांच्यासह पाकिस्तानचे दोन सदस्यांचे शिष्टमंडळ वाघा बॉर्डरवरून आज सकाळी भारतात पोहोचले. मोहसीन बट हे पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक आहेत.

या संमेलनाच्या दोन सत्रांद्रम्यान पत्रकारांनी त्यांना दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख असलेला सईद यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हे दोघेही अतिरेकी अंडरवर्ल्ड डॉन आहेत का? पाकिस्तान या दोघांना भारताच्या हवाली करणार का? यावर बट यांनी टाळाटाळ केली. सुरवातीला प्रश्न एकताच त्यांनी तोंडावर बोट ठेवले. त्यानंतर त्यांनी काही पुटपुट करत उत्तर देण्यासच नकार दिला.

२६-११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारत हाफिज सईदवर कायदेशीर करण्यासाठी जागतिक पातळीवर लढा देत आहे. भारताने वेळोवेळी पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपासून संयुक्त राष्ट्र महासभेत उपस्थित केला आहे.अमेरिकेनेही हाफिजविरुद्धचा खटला लवकर चालवा अशा शब्दांत पाकचे कान टोचले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या