प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर व वैशाली सामंत यांच्या गीतांवर श्रीरामपूरकर थिरकले. रेकॉर्ड ब्रेक गर्दी.




 श्रीरामपूर -अनुराधाताई आदिक मित्र मंडळ आयोजित शहर विकासाचा नवरात्र उत्सव कार्यक्रमात प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर व गायिका वैशाली सामंत यांनी गालावर खळी ,राधा ही बावरी, मला वेड लागले, गुलाबाची कळी ,ऐका दाजीबा ,झिंगाट, कोंबडी आदि गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत अक्षरशः नाचवले.

या कार्यक्रमास रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती त्यामुळे गायकांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता.
नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जातात, यावेळी अहमदनगर येथील ऊर्जा गुरुकुलच्या संचालिका कल्याणी फिरोदिया या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तसेच पुष्पलताताई आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्ष तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधाताई आदिक, अंजलीताई पुनातर- आदिक आदी यावेळी उपस्थित होते.
शुक्रवार दि. 30 रोजी,देवीच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली येथील उत्सव मंगल कार्यालय मध्ये देवीच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर शहरातील असंख्य महिला व भि.रा.खटोड कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भोंडला कार्यक्रम सादर केला, त्यानंतर मोरया डान्स अकॅडमीने एक नृत्य सादर केले. त्यानंतर नाशिक येथील रंगत ग्रुपचे पारस शहा राजीव शहा यांच्या दांडीया नाईट गायनावर श्रीरामपूरकर महिलांनी दांडिया नृत्य करत आनंद लुटला. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित अहमदनगर येथील ऊर्जा गुरुकुलच्या संचालिका कल्याणी फिरोदिया यांच्या हस्ते लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नवदुर्गा म्हणून सन्मानित करण्यात आले, यामध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या टीचर सुजाता शेडगे, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंगलाताई आढाव ,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुजाता मालपाठक,सामाजिक ज्योतीताई पवार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्वेता गुलाटी -दंड, कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वंदनाताई पवार ,रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. प्रेरणा शिरसाट, रुग्णसेवा करणाऱ्या सिस्टर मेरी जेन्सिया, तृतीयपंथी असूनही नवजात अभ्रकाला जीवनदान देत त्याचा सांभाळ करत असणाऱ्या हाजी पिंकी शेख यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महिलांनी दांडियाचा भरपूर आस्वाद घेत आनंद लुटला कार्यक्रमासाठी रंगत ग्रुपचे आज्ञा तूपलोंढे, प्रशांत महाले ,फारुख पिरजादे ,राकेश, सचिन ,विकी, धनंजय घागरे यांनी संगीत दिले.

'अनुराधाताई यांच्याकडे राजकारणी म्हणून न पाहता समाजकारणी म्हणून बघा महिलांसाठी नगर जिल्ह्यात एवढा मोठा कार्यक्रम फक्त अनुराधाताईच घेऊ शकतात त्यांना पकडून ठेवा, जिल्ह्यातील हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे आणि एवढा प्रतिसादही पहिल्यांदाच पाहते.'
कल्याणी फिरोदिया- संचालिका उर्जा गुरुकुल.
शहरातील अनेक महिलांना मिक्सर, इस्त्री, फूड प्रोसेसर, यांसह रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केले, स्वागत व कलाकारांचा परिचय नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी करून दिला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक म्हणाले अनुताईनी साडेपाच वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला,आता त्यांनी सर्वांनाच नाचवलेकाही मंडळी त्यांना घाबरून घरूनच कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत  कार्यक्रमासाठी महिलांची संख्या  लक्षणीय होती यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांसह अनुराधाताई आदिक मित्र मंडळाने परिश्रम घेतले.
अनुराधाताई आदिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संजय नगर येथील विद्यार्थ्यांनी सायली तिडके हिला बंपर प्राईज सायकल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या