महाराष्ट्रातील सत्तांतरावर अवधूत गुप्ते चित्रपट बनवणार ?

 



'गर्जा महाराष्ट्र', 'तुझे देखके मेरी मधुबाला..' सारख्या रीमिक्स-कॉम्बो सॉंगनी आपली इंडस्ट्रीला ओळख करुन देत पुढे एकापेक्षा एक दर्जेदार गाणी गात म्युझिक इंडस्ट्रीत आपलं अढळ स्थान बनवणारा अवधूत गुप्ते आज महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक-संगीतकार बनला आहे. केवळ म्युझिक नाही तर दिग्दर्शक,निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र अशी ओळख इंडस्ट्रीत आहे.

त्याच्या 'झेंडा','मोरया' सिनेमांना लोकांनी पसंती दिलीच, तर नुकत्याच रिलीज झालेल्या त्याच्या 'बॉइज ३' नं देखील बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. अवधूतचं राजकारण आणि राजकीय नेत्यांसोबतही सलोख्याचं नातं आहे. सध्या भाजपानं आयोजित केलेल्या मराठी दांडियाची सूत्र अवधूतकडेच आहेत. यानिमित्तानंच मुलाखतीत अवधूत गुप्तेनं राजकारण आणि मनोरंजन अशा दोन्ही विषयावर मनमोकळा संवाद साधला आहे.

या मुलाखतीत अवधूत गुप्तेनं रीमिक्स वरुन सध्या जो वाट पेटलाय म्युझिक इंडस्ट्रीत त्यावरही भाष्य केलं आहे. फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यात कोणाचं चुकलंय,कोणाचं बरोबर यावरचं आपलं मत त्यानं स्पष्टच मांडलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या काही ओरिजनल गाण्यांना कोणी छेडलं तर आपण त्याचं काय करु यावरही अवधूत स्पष्ट व्यक्त झाला आहे. पण हे सगळे खुलासे, अवधूतची स्पष्ट मत ऐकण्यासाठी आपल्याला वर बातमीत जोडलेली त्याची एक्सक्लुसिव्ह पॉडकास्ट मुलाखत ऐकावी लागेल.

याच मुलाखतीत अवधूतनं महाराष्ट्राच्या राजकारणावरही मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ पाहिली की आपल्यातला दिग्दर्शक जागा होतोय असं म्हणत त्यानं एक स्पष्ट विधान बोलून दाखविलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या