"कृषीमंत्री अन् उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घ्या"-आदित्य ठाकरेंची मागणी.

 



शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर सत्तार यांच्यावर सर्व क्षेत्रातून टीका केली जात होती. यावर आज आदित्य ठाकरे यांनी त्या विधानाचा निषेध केला आहे. आणि सत्तारांवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले "कृषी मंत्री आणि उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता, आमचं लक्ष ठेवून आहे, राष्ट्रीय महिला आयोग कृषी मंत्र्यांवर काय कारवाई करणार, काल जे शब्द वापले त्याचा आपण उच्चार देखील आपण करू नाही शकत. आणि तो शब्द सात-आठ वेळा वापला, ते शब्द त्यांनी मागे घेतले नाहीत.

असं महिलांवर बोलणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फोनवर समजूत देतात. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. महिलांसाठी हे राज्य खोको सरकार खाली सुरक्षीत नाही, त्यानंतर महारष्ट्रातून गेलेल्या उद्योगावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले " घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्पावर समोरा- समोर बसून चर्चा करावी माझ त्यांना चॅलेंज आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या