भेंडे खुर्दच्या ग्रामपंचायतीच्या निवणुकीत मतदाराचा अभूतपूर्व प्रतिसाद

 

भैरवनाथ ग्रामविकास पॅनलची मतदारांमध्ये जोरदार चर्चा : सरपंच पदाचे उमेदवार वर्षा नवले यांचा विजय सुकर होण्याच्या दिशेने



भेंडे : नेवासा तालुकयातील भेंडे खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक अंतिम टप्याकडे जात असताना निवडणूक चांगलीच शिंगेला पोहचली. शुक्रवारी (ता.१६) निवडणुकीच्या समारोपप्रसंगी गावातील भैरवनाथ मंदिर येथून काढलेल्या रॅलीला मतदाराचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भैरवनाथ ग्रामविकास पॅनलची मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली असून सरपंच पदाचे उमेदवार वर्षा नवले यांच्यासह संपूर्ण पॅनलचा विजय हा सुकर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 


गावचे माजी सरपंच बाळासाहेब नवले यांच्या वस्तीवर निवडणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी माजी सरपंच इंदुताई नामदेवराव नवले, माजी चेअरमन विजयकुमार नवले, ज्येष्ठ नेते राधाकिसन भागवत, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान महापूर, दत्तात्रय नवले, सरपंच सुनील खरात, भाऊसाहेब चौधरी, माजी सरपंच बाळासाहेब चौधरी, उद्योजक किशोर नवले, वैभव नवले, सरपंच पदाचे उमेदवार वर्षा नवले, बाबासाहेब महापूर, वसंत नवले, प्रा. सविता नवले, पंढरीनाथ कुसाळकर, कचरू पालवे यांच्यासह सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. यावेळी उपस्थित व्यक्तीनी आपल्या मनोगतातून गावाच्या विकासासाठी सर्वजण एक असून गाव भयमुक्त ठेवण्यासाठी काम करू, असे आश्वासन मतदारांना देण्यात आल्याने टाळ्याचा कडकडाटसह मतदारांनी प्रतिसाद दिला.

______________

कुठल्याही दबावाला बळी पडू नका : घुले पाटील


भेंडे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका गटाकडून कारखान्याच्या नावाखाली ग्रामस्थांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. नोकरीवर गदा येण्याच्या भीतीने काही ग्रामस्थ धास्तावले होते. दरम्यान या संदर्भात गावातील सुज्ञ नागरिकांनी थेट माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी 'आम्ही कुठल्याही गाव पातळीच्या राजकारणात लक्ष घालत नाही. ग्रामस्थांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये. आपल्या मर्जीप्रमाणे हवे त्या उमेदवाराला मतदान करा. कुठलाही गट निवडून आला तरी भेंडे खुर्द ग्रामपंचायतीला आम्ही पुरेपूर मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या