राजकीय,सामाजिक व खेळाच्या मैदानावर आ.लंके यांचे आदर्श काम - पद्मश्री पोपटराव पवार.



 पारनेरमधे राज्यस्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धेला जल्लोषामधे सुरवात..

पारनेर  : पारनेरमधे व्हाॅलीबाॅल प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद, " राज्यस्तरीय हॉलीबॉल " स्पर्धेचा शुभारंभ आदर्श गांव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शुभहस्ते पारनेर क्रिडा संकुलवर करण्यात आले.या दोन दिवसीय राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धमधे च महाराष्ट्रातील १९ पुरुष संघ तर, ८ महिला संघ राज्यभरातुन सहभागी होणार आहेत.

हॉलीबॉल स्पर्धेचा प्रारंभ पुणे व बीड या जिल्हा संघांदरम्यान  शो मॅचने झाला.या स्पर्धेमधे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले आहेत.

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले,खेळाचे मैदान व राजकीय मैदान वेगवेगळे असले तरी, पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे राजकीय,सामाजिक मैदानासह खेळाचे मैदानावरील काम आदर्शवत आहे.खेळामुळे माणूस शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होतो. आम्ही जेव्हा वाडीयापार्कच्या मैदानावर क्रिकेटचा सराव करायचो, त्यावेळी खूप व्यायाम व्हायचा. त्यामुळे आज हजारो किलोमीटर पर्यंतचा प्रवास केला तरी थकवा जाणवत नाही. आज चित्र बदलतंय. आईवडिलांना आता मुलांच्या खेळासाठी वेळ द्यायला लागतोय.पॅकेज आणि मिडियाच्या जमान्यात खेळाचे महत्व कमी होवुन खेळ मागे पडला आहे हि खरी शोकांतिका आहे असे मत पवार यांनी व्यक्त केले.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले,सध्या व्हालीबॉल हा ग्रामीण भागातील एक आवडता खेळ बनलाय.डायरेक्ट व्हाॅलीबाॅल प्रमोशन असोसिएशनच्या माध्यमातुन आमदार निलेश लंके हे हाॅलीबाॅल या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेतील. तसेच राज्यामधे पारनेरची वेगळी ओळख निर्माण करुन देण्याचे काम आमदार निलेश लंके यांनी केले आहे, असे गौरवोद्गार मा.मंत्री तनपुरे यांनी काढले.

यावेळी बोलताना आयोजक व राज्य हाॅलिबाॅल असोसिएशनचे अध्यक्ष आ.निलेश लंके म्हणाले,हाॅलीबाॅल स्पर्धेमधे राज्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.स्पर्धेचा मुळ उद्देश हाॅलीबाॅलच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर न्याय मिळावा हाच आहे.राज्यातील २६ जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय.येणार्‍या काळामधे हाॅलीबाॅल खेळाडूंना चांगले दिवस येतील.

  

याप्रसंगी मा.मंत्री अशोकराव सावंत,माजी सभापती सुदामराव पवार,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, शरद कदम,प्रा.बबनराव झावरे प्रा संजय लाकुडझोडे,गुरुदत्त मल्टिस्टेटचे अध्यक्ष बा.ठ. झावरे,अशोक घुले, ज्ञानदेव लंके गुरुजी भागुजी झावरे,दिपक अण्णा लंके, चंद्रकांत ठुबे, सभापती योगेश मते, डॉ.बाळासाहेब कावरे, नंदकुमार औटी नगरसेवक भुषण शेलार विजय डोळ शाहिरमामा गायकवाड कैलास गाडिलकर सरपंच सचिन पठारे दौलत गांगड सुवर्णा धाडगे  युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे तालुकाध्यक्ष पुनमताई मुंगसे जयवंत साळुंखे नगरसेवक नितीन आडसुळ भाऊ चौरे डॉ मुदस्सर सय्यद राजू तांबे सतीश गंधाक्ते अशोक चेडे श्रीकांत साठे डॉ विद्या कावरे निता औटी प्रियंका औटी सचिन औटी सुभाष शिंदे बाळासाहेब मते भाऊसाहेब भोगाडे डॉ सादिक राजे बबन‌ चौरे आदींसह राज्यातील नामवंत खेळाडू यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले तर,आभारप्रदर्शन प्रा.संजय लाकुडझोडेसर यांनी केले.


छाया : दत्ता गाडगे

राज्यस्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धेचे उध्दाटन करताना पद्मश्री पोपटराव पवार व मा.मंत्री प्राजक्त तनपूरे,आयोजक व हाॅलीबाॅल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष आमदार निलेश लंके व मान्यवर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या