संगणकीय बांधकाम नोंदीसाठी उंड्री ग्रामस्थांवर आंदोलनाची वेळ

 उंड्रीगाव महापालिकेत गेल्यानंतर सहा वर्ष संगणकीय नोंदीची प्रतीक्षा...

पुणे : उंड्रीगाव संघर्ष समितीच्या वतीने पालिका उपायुक्त अजित देशमुख यांना निवेदन देताना ग्रामस्थ
(छाया:  संदिप डोके, हडपसर)


प्रतिनिधी / राष्ट्र सह्याद्री 
हडपसर : हवेली तालुक्यातील उंड्री ग्रामपंचायत पुणे महापालिकेत समाविष्ट होऊन तब्बल सहा वर्षे झाली. मात्र अद्याप बांधकामाच्या संगणकीय नोंदी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होत नाहीत. अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. येत्या आठ दिवसात संगणकीय नोंदीचे काम पूर्ण न झाल्यास उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा उंड्री गाव संघर्ष समितीच्या वतीने जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी दिला.

उंड्री(ता.हवेली) हे गाव सन २०१७ पर्यत ग्रामपंचायत हद्दीमध्ये होते. मात्र २०१७ ला सदरील गाव हे पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झाले. परंतु पालिकेमध्ये समाविष्ट झाले. तरी सदरील गावातील बांधकाम कर नोंदी अद्यापही पालिकेने संगणकीय (पिडीएफ) केल्या नाहीत. 

उंड्रीगाव संघर्ष समितीने विविध मागण्यासाठी २० ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत महानगरपालिकेच्या ढिसाळ कामकाजाच्या निषेधार्थ आठ दिवसांचे उपोषण केले होते. त्यानंतर पुणे महानगर पालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी लवकरात लवकर तुमची कामे करु, असे आश्वासन देऊन पत्र ही दिले उपोषण सोडविले. मात्र ८ ते ९ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप कोणतेच काम संबंधित विभागाने केले नाही. 

उंड्री ग्रामपंचायत ने 2017 18 पर्यंत मिळकतीवर कर वसूल केलेला आहे. मात्र हा भाग महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर कर संगणकीकरण रखडले आहे. त्यामध्ये २० टक्के, ४० टक्के व ६० टक्के अशी वाढ करुन तो उंड्री गाव ग्रामस्थानकडुन घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन पालिका आयुक्त यांना   उंड्रीगाव ग्रामस्थानच्या वतिने देण्यात आले. या वेळी पुणे मनपा आयुक्त यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर उंड्रीगावचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे उंड्रीगाव संघर्ष समितीने सांगीतले. 

यासंदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र भितांडे, सुभाष टकले, उत्तम फुलावरे, दादासाहेब कड, हनुमंत घुले, अनिल कानडे, वंसत कड, प्रविण अबनावे,  गणेश कानडे, मोहन भाडाळे, ओंकार होले, राजेंद्र होले, अविनाश टकले, विशाल कामठे, सचिन पुणेकर, सुभाष घुले उपस्थित होते.

______'__


उंड्री गाव पालिकेत गेल्यापासून कुठल्याच नागरी सुविधा मिळत नाहीत. त्यात निवडणुका न झाल्याने लोकप्रतिनिधी नाही. ग्रामस्थांनी प्रश्न मांडायचे कुणाकडे असा प्रश्न निर्माण होतो. पालिका प्रशासन सामान्य माणसाला उडवा उडवीची उत्तरे देतात. आंदोलने केल्यानंतर आश्वासने देऊनही त्याची पूर्तता होत नाही. आता आठ दिवसात मागण्या पूर्ण केल्या नाही तर लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करण्यात येईल. 

- जनसेवक राजेंद्र भितांडे 

 

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

  1. ทดลอง เล่น สล็อต มีบริการทดสอบเล่นสล็อตรวมทุกค่ายเว็บไซต์ตรง pg slot ทุกค่ายเกมสล็อต ฟรี ไม่ต้องสมัคร ทุกเกม ถอนได้ เบทสูง ไม่กระดอน ไม่มีปิดปรับแก้ให้เลือกเล่นมากมายก่ายกอง

    उत्तर द्याहटवा
  2. meslot123 ความสนุกสนานร่าเริงของเว็บแห่งนี้ทำให้ผู้เล่นสามารถเล่นเกมสล็อตออนไลน์ได้ตลอด 1 วัน ไม่จำเป็นที่ต้องเดินทางไกลไปยังคาสิโน pg slot แบบเริ่มแรกอีกต่อไป กับเราพีจีเกม

    उत्तर द्याहटवा
  3. megagame88 เว็บไซต์ สล็อตออนไลน์ pg slot ที่บริการเกมสล็อตมากยิ่งกว่า 1000 เกม Megagame88 รวมเกมสล็อตออนไลน์ ของทุกค่าย ทั้งโลก เว็บไซต์ตรง ดึงตรงจากไทย จากพวกเราได้เลย

    उत्तर द्याहटवा
  4. Pgslot Vc ทุกเกมคุณสามารถรับฟรีจากเว็บไซต์ของเราได้ในทันทีทันใด all rights reserved เพียงประพฤติตามกติกาที่ดินเว็บไซต์ PG SLOT เจาะจงคุณก็ได้ช่องทางรับฟรีจากการเล่นเกม Slot pg ไม่มียอดอย่างต่ำ

    उत्तर द्याहटवा
  5. pgaztec เกมแตกดี ที่สุด ในตอนนี้ เป็นหนึ่งในเกมสล็อตที่ได้รับความนิยมจากผู้เล่นมากมาย เกมนี้มีธีมที่น่าสนใจจากชุดหุ่นของชนบทและวัฒนธรรมอะซเทคจาก pg slot ซึ่งนำเสนอบรรยากาศ

    उत्तर द्याहटवा