नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्नसाठी शिफारस


नवी दिल्ली

भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय खेल पुरस्कार समितीने भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस केली. नीरजशिवाय टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या रवी दहिया, पीआर श्रीजेश आणि लवलीना बोरगोहोई, भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि फूटबॉलपटू सुनील चेत्री, पॅरालिम्पिकमध्ये एफ64 मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या सुमित अंतिल, प्रमोद भगत ( पॅरा बॅडमिंटन), अवनी लेखरा (पॅरा शूटिंग), कृष्णा नगर ( पॅरा बॅडमिंटन), एम नरवाल (पॅरा शूटिंग)  यांच्यासह ११ खेळाडूंचा यादीत समावेश आहे. याशिवाय 35 भारतीय खेळाडूंची नावं अर्जुन पुरस्कारासाठी देण्यात आली आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या