घरफोडीचे 12 गुन्हे दाखल असलेला आरोपी अखेर जेरबंद


बारामती 

माळेगांव, सांगवी परीसरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अखेर तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. महेश भिमा शिंदे रा.(सांगवी ता. फलटण जि सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गेल्या चार महीन्यापासून बारामती, शारदानगर माळेगांव, सांगवी भागांमध्ये घरफोडी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक यांनी सदरचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या  सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकास अभिलेखावरील आरोपी चेक करणे, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याबाबद सुचना दिल्या होत्या.

सदर आरोपीचा शोध चालू असताना  सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे व स्टाफ, तसेच तपास पथकाचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून आजूबाजूचे सिसिटीव्ही व तांत्रीक माहीतीचे आधारे आरोपींचा शोध सुरू केला. यातील आरोपींचा शोध सुरू असतांना राहूल घुगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा (सांगवी ता. फलटण जि सातारा) येथील इसम नामे महेश भिमा शिंदे याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. अशी माहीती मिळाली. दरम्यान पोलीस निरीक्षक  ढवाण यांना माहिती ही मिळताच त्यांनी लगेच  गुन्हेगारास जेरबंद करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक  राहूल घुगे व पथकास दिल्या  सदरच्या टिमने आरोपी महेश भिमा शिंदे यास सांगवी ता. बारामती  येथून सापळा रचुन शिताफीने अटक केली आहे.

आरोपीस मा. न्यायालयाने दि. १४ ऑक्टोबर  पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला . गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक  राहूल घुगे हे करीत आहेत.

आरोपीकडे तपास करता त्याने वर नमुद गुन्हयासह शारदानगर येथे झालेली एटीएम फोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा, देवकाते पाटीलगनगर येथील घरफोडीचा गुन्हा केल्याचे सांगून गुन्हयाचे ठिकाण दाखविले आहे. देवकाते पाटीलगनगर येथील घरफोडीचा गुन्हयातील चोरी गेले सोन्यापैकी ४.५ तोळे वजनाचे एकूण २ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. सदरबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन

येथे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपीने तपासादरम्यान फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हददीमध्ये  मध्ये साठे फाटा फलटण येथील ए व्ही गार्डन परमीट रूममधून दिड लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीची दारू घरफोडी चोरी करून नेली असल्याची कबुली दिली आहे.

याबाबद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीने तपासादरम्यान देवकाते पाटीलगनगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील चोरून नेलेले सोन्याचे दागीणे इसम नामे बाळकृष्ण तात्याबा यादव (रा सांगवी ता.फलटण जि सातारा) यांचेकरवी विकी केल्याने त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. त्या गुन्हयाचा तपास सपोनि  महेश विधाते हे करीत आहेत. सदरचा आरोपी हा फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील आरोपी असून त्याचेवर ११ घरफोडीचे व ०१ दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण  अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक  मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे , बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक  राहुल घुगे, पोलीस हवालदार रावसाहेब गायकवाड, शशिकांत वाघ, पोलीस नाईक  राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे, पोशि प्रशांत राऊत, दिपक दराडे, तपास पथकाचे विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, राहूल पांढरे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या