नवज्योत सिंग सिद्धूंचे सोनिया गांधींना 13 मागण्यांबाबत पत्र


नवी दिल्ली

पक्षप्रमुख सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत दिलेला सल्ला दुसऱ्याच दिवशी कुचकामी ठरताना दिसला. रविवारी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना 13 मागण्यांबाबत पत्र लिहिले. सिद्धू यांनी हे पत्र त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील पोस्ट केले.

सोनिया गांधींना पत्र लिहिण्याच्या बहाण्याने सिद्धू यांनी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस हायकमांडने अनुसूचित जातीचे मुख्यमंत्री बनवून पुरोगामी निर्णय घेतला. असे असूनही अनुसूचित जातींना सरकारमध्ये समान प्रतिनिधित्व मिळाले नाही. ही गोष्ट महत्वाची आहे कारण अनुसूचित जातीचे मुख्यमंत्री बनवण्याच्या मुद्यावर काँग्रेस पुढील निवडणुकीत जाणार आहे. अशा परिस्थितीत सिद्धू यांचे हे विधान काँग्रेससाठी धक्कादायक ठरू शकते. या पत्रानंतर राजीनामा मागे घेणाऱ्या सिद्धू यांच्या सरकारविरोधातील बंडखोर वृत्ती अबाधित असल्याचे दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या