टी 20 विश्वचषकचे वेबसाईटवर प्रसारण नाही


नवी दिल्ली

दिल्ली उच्च न्यायालयाने बनावट संकेतस्थळांवर आयसीसी पुरुष विश्वचषक २०२१ चे सामने प्रसारित करण्यास बंदी घातली आहे, कारण यामुळे स्टार चॅनेल आणि डिस्ने प्लस - हॉटस्टारच्या विशेष प्रसारण अधिकारांचे उल्लंघन होत आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हणाले की जर बनावट संकेतस्थळांवर अंतरिम स्थगितीचे आदेश या टप्प्यावर दिले गेले नाहीत तर विशेष प्रसारण अधिकार धारकांना  नुकसान होईल.  या न्यायालयात पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत याचिकाकर्त्याच्या बाजूने अंतरिम स्थगितीचे आदेश देण्यात आले आहेत, असे न्यायाधीश म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या