हत्या आरोपी सरवजीतला 7 दिवसांची पोलीस कोठडी

हत्या केल्याची 'मला अजिबात खंत नाही' - सरवजीत


नवी दिल्ली

गेल्या वर्षभरापासून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर केंद्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. या एका वर्षाच्या आंदोलनात अनेक आंदोलनकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी पुन्हा सिंघू बॉर्डरवर एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.

एक हात दोरखंडांनी बांधून, दुसरा हात मनगटापासून कापण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणाच आंदोलनात खळबळ उडाली होती. सदरील हत्येमागे निहंग शिख गटाचा हात असल्याचे बोलले जात होते. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी निहंग सरवजीत सिंग यांने पोलीसांकडे आत्मसमर्पण करून, आपणच ही हत्या केल्याची कबूली दिल्यानंतर त्याला आज न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

आरोपी सरवजीत याला 14 दिवसांची पोलीस कोठडी व्हावी अशी मागणी पोलीसांनी कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने सरवजीत याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 'हत्या केल्याबद्दल आपल्याला कोणतीही खंत नसल्याची' देखील सरवजीतने म्हटले आहे. सरवजीतने इतर चार आरोपींची नावे देखील सांगितली असून, त्यांच्याकडून शस्त्र जप्त करायची असल्याचे पोलिसांकडून यावेळी सांगण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या