देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट AY4

इंदोरच्या सात रूग्णांच्या नमुन्यांत पुष्टी


इंदोर 
 

देशात कोरोना प्रादूर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला असला, तरी इंदोर मध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटची प्रकरणे समोर येत होती. मात्र आता जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात डेल्टाचाच आणखी एक नवीन व्हेरिएंट (एवाय 4.2) आढळून आला आहे. 

मध्य प्रदेशातील इंदोर सह अन्य ठिकाणांहून संकलित नमुने नवी दिल्लीतल्या एनसीडीसी लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. त्यांच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची 7 प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एवाय 4 व्हेरिएंटची सर्वाधिक  प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. इंदोर मध्ये सध्या दररोज एक किंवा दोन कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. 1 ते 16 ऑक्टोबरपर्यंतचे नमुने पाठवण्यात आले होते. 16 ऑक्टोबरच्या अहवालात 7 नमुन्यांमध्ये नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसचे स्वरूप बदलत असते. या प्रकाराच्या संसर्गाविषयी आता लगेच काहीही बोलणे योग्य नाही, कारण स्पष्ट अभ्यास झालेला नाही. भारतात दिली जाणारी लस ही सर्व प्रकारांवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे मात्र, पुढील 4 ते 5 वर्षे आपल्याला दरवर्षी लस घ्यावी लागणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या