Breaking News

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत

एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता ठाकरे सरकारची घोषणा


मुंबई 

राज्यातल्या पूरग्रस्त तसेच अतिवृष्टी बाधितांसाठी आता ठाकरे सरकारने१० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. 

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

  • जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
  • बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
  • बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
  • ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments