मला आजही वाटते मीच मुख्यमंत्री आहे!


मुंबई

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा मन की बात केली आहे. तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवले नाही की मुख्यमंत्री नाही. मला असे वाटते मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात वक्तव्य केले आहे.

विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा गोवर्धिनी मातेकडेच मी येणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचे नाही, तो काय करतो हे महत्त्वाचे आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेने देखील हे जाणवू दिले नाही की मी आता मुख्यमंत्री नाही आहे.

देवेंद्र फडणवीस यांना ते मुख्यमंत्री नाही आहेत, असे वाटतच नाही आहे. त्यांना आजही मीच मुख्यमंत्री आहे असे वाटते, असे त्यांनी जाहीर सभेत प्रतिक्रिया दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या