दिव्यांगांना सन्मानाने वागवावे - प्रांताधिकारी कचरे


भोर

प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना काही कमतरता असते.शरीराने धडधाकट असलेली माणसं मनाने कणखर असतीलच असे नाही.शारीरिक कमतरता असूनही अनेक दिव्यांग बांधवांनी जीवनात यश मिळवले आहे.दिव्यांगांना समाजात सन्मानाने वागवले पाहिजे असे मत भोरचे प्रांत राजेंद्र कचरे यांनी व्यक्त केले.येथील तहसील कार्यालयात जागतिक अंध दिनी तहसीलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अंध, दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.याप्रसंगी दिव्यांग बांधव दिलीप शेडगे, ज्ञानेश्वर अब्दागीरे, शरद माने,राहुल घोणे,शंकर कुमकर,धनाजी शिनगारे यांचा सत्कार प्रांत राजेंद्र कचरे यांच्या हस्ते करण्यात आला. तहसीलदार सचिन पाटील यांनी उपस्थितांना शासनाच्या वतीने सुरू  असलेल्या अंध,अपंग कल्याणकारी योजनांची माहिती दिली.तसेच शासकीय पातळीवर दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर,निलेश कुंभार,अपंग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष बापू कुडले,भानुदास दुधाने,मनीषा गायकवाड,सुजाता तनपुरे,सतीश गायकवाड उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या