ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक लागणार.....?


शेवगाव प्रतिनिधी 

एसटी कामगारांचे शासनात विलीनीकरण करावे. यासाठी विविध संघटना तीन ते चार वर्षापासून शासनाशी झगडत आहेत. या संदर्भात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबरला बेमुदत उपोषणासाठी आम्ही कृती समितीचे पदाधिकारी बसणार असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढणार असल्याचे प्रतिपादन एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीपराव शिंदे यांनी केले.

       शेवगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी शेवगाव येथे एसटी कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात एसटी कामगारांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असलेले एसटी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदिप शिंदे हे बोलत होते.

     यावेळी एसटी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताटे, विभागीय सचिव ज्ञानदेव अकोलकर, आगार अध्यक्ष संजय धनवडे, आगर सचिव दिलीपराव लबडे यांनी देखील आपल्या मनोगतात एसटी कामगारांच्या व्यथा मांडल्या तसेच पगार वाढीसह एसटी कामगारांच्या विविध मागण्या सह एसटी कर्मचाऱ्यांना शासनात विलनिकरन करावे. एसटी कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासह विविध प्रश्न देखील यावेळी मांडण्यात आले आहे.

        यावेळी शेवगाव शेवगावचे पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज घुले, पाथर्डीचे माजी सभापती गोकुळ दौंड, शेवगावचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. किसन चव्हाण, संजयभाऊ फडके, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, कॉम्रेडचे नेते संजयराव नांगरे, अमोल फडके, अमित फडके, संजय फडके ज्ञानदेव अकोलकर, रावसाहेब जाधव, लक्ष्मन लव्हाट, पांडुरंग देशमुख, राजेंद्र देवढे, राहुल शेळके, गणेश बर्गे, ज्ञानेश्वर बर्गे, एसटीच्या महिला कर्मचारी सुवर्णा देवकाते, शीतल चेमटे, सुरेखा महानुभव, बाळासाहेब सावंत, 

रमेश काकडे, संतोस सोंडे, गणेश दौड, दत्तात्रय गाडेकर, दत्तात्रय चितळे, महादेव बोरुडे, अरुण दळवी, राजेंद्र पवार, उत्तम रनसिंग, देविदास कहाणे, संजय गाडे, बाळासाहेब सोनटक्के, प्रवीण ढगे, रोहिदास अडसूळ, नांदकुमार कानकाटे, सुरेश औटी यांच्यासह एसटी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील एसटी संघटनेचे विविध पदाधिकारी तसेच विविध राजकीय क्षेत्रातील प्रमुख यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेवगाव आगार सचिव दिलीप लबडे यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली कदम यांनी केले तर विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या