थोरातांच्या संगमनेरात विखे पाटलांना भरभरून प्रतिसाद!

वयोश्री योजनेचे शिबीर : पाच हजार ५९५ नागरिकांना लाभ  । आज पारनेरमध्ये समारोप; जिल्ह्यात विक्रमी ३१ हजारांवर नोंदणी


संगमनेर 

पदमश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुक्यात आयोजित केंद्र शासनाच्या वयोश्री योजनेच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी आयोजित या शिबिरात पाच हजार ५९५ नागरिकांनी नोंदणी केली. लाभार्थी वृद्धांनी आयोजक खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखेपाटील यांना भरभरून आशीर्वाद दिले. 'केंद्र सरकार कोणतीही मदत करीत नाही या विरोधकांच्या आरोपाला राष्ट्रीय वयोश्री योजना हेच उतर असल्याचे प्रतिपादन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले. केंद्राच्या योजना सर्वासाठीच असल्याने राज्यातील सताधारी पक्षातील जेष्ठांनाही फायदा घेण्यास हरकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

संगमनेर येथील मालपाणी विद्यालयात राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या उतर नगर जिल्ह्यातील सहाव्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे औपचारिक उद्घाटन आ.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ सुजय विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड,  उतर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे, उतर नगर जिल्हयाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात देशात सर्वाधिक नागरीकांना लाभ देण्यात आला. तथापि, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे मात्र आतापर्यंत आयोजित शिबिरात कुठेही दिसले नाही. 

शासानाच्या योजनेची अंमलबजावणी करताना पक्षपात नसतो. त्यामुळे सर्वासाठी या योजनेची सुरूवात केली आहे. संगमनेर तालुक्यात मिळालेला प्रतिसाद पाहाता या तालुक्यात फक्त मूठभर लोकासाठी योजना राबविल्या जातात. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता गावागावतील प्रभागांमध्ये जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहचल्याने मोदींच्या योजनेचा लाभ या जेष्ठ नागरीकांना मिळवून देता आल्याचे समाधान आ. विखे पाटील यांनी व्यक्त केले. खा.सुजय विखे पाटील यांनीही राज्यातील मंत्र्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचे सुरू असलेले काम या शिबीरात येवून पाहावे, असे आवाहन केले. 

संपूर्ण शिबिरात जेष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातील सर्वच भागातील नागरीकांनी उत्स्फूर्तपणे येवून आधार साहीत्याची नोंदणी केली.आलेल्या सर्व जेष्ठांना आ.विखे पाटील मार्गदर्शन करून आस्थेने चौकशी करीत होते. शिबीरात कान, डोळे, दात यासाठी लागणाऱ्या साहीत्याची मागणी नोंदणीकरीता मोठी गर्दी होती. या सर्व नागरीकांना डॉ सुजय विखे पाटील मार्गदर्शन करीत होते. शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी भेटी देवून या उपक्रमाचे कौतुक केले. सांयकाळी उशिरापर्यंत ही नोंदणी सुरू होती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या