विहिरीत पडलेल्या बिबटया मादीला जीवदान


ओतूर

ओतुर (ता.जुन्नर) येथील  हांडेबन शिवारात  पोपट बाळशिराम खंडागळे  यांचे  मालकीच्या  (गट क्र.११७ ) शेती क्षेत्रातील  विहीरीत बिबट्या  पडल्याची  माहिती भ्रमणध्वनीद्वारे ओतूर वनविभाग कार्यालयाला समजली असता लागलीच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे ,वनपाल  सुधाकर गिते,  वनरक्षक  अतुल वाघोले,सुदाम राठोड  व वनकर्मचारी  किसन केदार, फुलचंद खंडागळे  गंगाराम जाधव, गणपत केदार तसेच मानिकडोह येथील  बिबट निवारा केंद्राची रेस्कुटीम घटनास्थळी त्वरेने  दाखल झाली  व रेस्कुटीम चे पशुवैद्यकीय अधिकारी  निखील बनगर, महेंद्र ढोरे  यांनी  रेस्कुटीमच्या मदतीने  बिबट्यास सुरक्षितपणे  विहिरीतून बाहेर काढण्यात आले. अधिक  तपासणी केली असता  सदर बिबटया अंदाजे ७ ते ८ महीने वयाचा व मादी प्रकारातील  असल्याचे माणीकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी  निखील बनगर यानी माहिती देताना सांगितले  सदरचा मादी बिबटया भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडल्याचे समजते त्यास पुढील   प्राथमिक उपचारार्थ मानिकडोह येथील  बिबट निवारा केंद्रात  दाखल करण्यात  आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या