कर्तृत्व हेच माणसाचं व्यक्तिमत्त्व असतं ; इंदुरीकर


नसरापूर प्रतिनिधी

आजच्या तरुणाईला क्लिप बनवणे  व वायरल करणे, याशिवाय दुसरा उद्योग नाही. व्हिडिओ  क्लिप वरती माणसाचं व्यक्तीमत्व  अवलंबून नसतं तर माणसाच कर्तृत्व हेच माणसाचं व्यक्तिमत्त्व असत असे प्रतिपादन इंदुरीकर यांनी केले.

हातवे तालुका भोर येथील हरिभाऊ बाबुराव शेलार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे सुपुत्र भोर पंचायत समितीचे सभापती लहू शेलार व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे नेते मदन शेलार यांनी माळेगाव तालुका भोर श्रीराम मंगल कार्यालय येथे प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. 

इंदुरीकर म्हणाले की, आजच्या तरुणाईने मोबाईलच्या विळख्यात न अडकता चांगले शिक्षण घेऊन आपले करिअर कसे घडवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. अलीकडची तरुणाई रात्र न दिवस मोबाईल मध्ये इतके अडकले आहे की , त्याच माणसाला समाजात स्थान मिळत की  ज्याचं  कर्तुत्व  व  स्वच्छ चारित्र्य असत. यावर ते  अवलंबून आहे.

मोबाईलचा वापर गरजेनुसार करा. मोबाईल संस्कृती आल्याने आपला धर्म ,संस्कृती बुडत चालली आहे. वाचन संस्कृती लयाला गेलेली आहे. माणसा माणसातला संवाद या मोबाईल मुळे हरवलेला आहे .त्यामुळे आज माणसाला मोबाइल मुळे अनेक अडीअडचणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी आजच्या तरुणाईने मोबाईलचा वापर आवश्यकते नुसारच करावा .मोबाईल मध्ये आता काही चांगलं राहिलं नाही.

हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे  कीर्तन  ऐकण्यासाठी  पुणे शहर व भोर आणि वेल्हे तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक, राजकीय ,सहकार कृषी, क्रीडा, शेतकरी आदी विविध क्षेत्रातले मान्यवर व  नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या