रस्ता लूट करणारा गजाआड


नगर प्रतिनिधी 

रात्रीच्या वेळी गाडया अडवुन रस्ता लुट करणारा विनोद उर्फ पांड्या कडू बाळ सरकाळे (रा.सर टाकळी ता शेवगव) याला गजाआड करण्यात तोफखाना पोलीसांची दमदार कारवाई.

दि .11 ऑक्टोबर 2021 रोजीचे पहाटे 05:30 वा. चे सुमा . तोफखाना पोलीस स्टेशन हति समाधान हॉटेलचे जवळ , कल्याण बायपास रोड , अहमदनगर येथे पिक अप गाडीला मोटार सायकल आडवी लावुन गाडीला कट का मारला असे म्हणुन चाकुचा धाक दाखवुन पिक अप गाडीवरील ड्रायव्हरचे खिश्यातील 15,800 रुपये काढुन नेले. या बाबत तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचे आदेशान्व्ये पो.उप निरी . समाधान सोळंके यांचेकडेस देण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी सदर गुन्हयाचा तपास वेगाने फिरवुन यातील आरोपी विनोद ऊर्फ पांडया कडुबाळ सरकाळे (वय 27 वर्षे), यास अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरलेला माल हस्तगत करुन इतर आरोपीचे नावे निष्पन्न केले आहेत . 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या