जामखेड - करमाळा महामार्गावरील धुळीमुळे नागरिकांचे डोळे पांढरे


जामखेड तालुका प्रतिनिधी

जामखेड - करमाळा राज्य महामार्गावर रस्त्यावर मोठ -  मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांची डागडुजी डांबर टाकून करण्याची गरज होती ; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने एका महिन्यापूर्वी या खड्यांमध्ये मातीमिश्रित मुरूम टाकला आहे. यामुळे धुळीचे लोट उडत असून , उडणाऱ्या धुळीने  जामखेड - करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत. त्यामुळे विकास कामे पाहून डोळे पांढरे  होतील तेव्हा होतील पण आत्ता धुळीने डोळे खराब होतायत त्याचं काय ? असा सवाल नागरिक विचारात आहेत.

मोठमोठी वाहने सुसाट वेगाने धावतात वाहन गेल्यावर वाहनांच्या मागे प्रचंड प्रमाणात धूळ उडते ही धुळ नागरिकांच्या नाका-डोळ्यात जात असल्याने वाहनचालकांना सर्दी , डोकेदुखी , श्वसनाचे आजारात वाढ होत आहे. आधीच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली खड्डयांची डागडुजी केवळ वेळ मारून नेण्याचे धोरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या मनमानी कारभाराने त्रस्त झालेले नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

हे माणसे मारण्याचे तर तंत्र नाही ना ?

या रस्त्याने रोज शेकडो वाहने ये - जा असता  करत असता जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना नवीन दुखणे तयार झाले आहे ते म्हणजे या रस्त्याने रोज जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना आता मणक्याचा आजार सुरू झाले आहेत. या मार्गावरच वसलेल्या २५ गावांच्या ग्रामस्थांत धुळीमुळे श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत व अनेकांना फुप्फुसाचे आजारही वाढले आहेत. याला जबाबदार कोण ? हे माणसे मारण्याचे तर तंत्र नाही ना ? अशी विचारणा सर्वसामान्यांतून होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या