मशाली पेटवून समीर वानखेडेंना समर्थन


पुणे प्रतिनिधी

पतित पावन संघटनेतर्फे कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांना समर्थन देण्यासाठी कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक समोर मशाली पेटविण्यात आल्या. तसेच व्यसनी युवकांना पाठीशी घालणाऱ्यांच्या विरोधात निदर्शने देखील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. 

यावेळी राजाभाऊ पाटिल, श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, स्वप्नील नाईक, दिनेश भिलारे, हारळे पाटिल, पप्पू टेमघरे, विजय गावडे, संतोष शेंडगे, मनोज पवार, अरविंद परदेशी, विनोद चौधरी, राजाभाऊ बर्गे, सुनील मराठे, योगेश वाडकर, सुरेश खोले, अजय घारे, सौरभ पवार, विश्वास ननावरे, अमर काकड़े, सूरज पोटे, अक्षय बर्गे, अजय कवटे, प्रवीण ठाकुर, तेजस पाबळे, सागर धीवार, दीपक परदेशी आदी उपस्थित होते. 

आज ऐन तारुण्यात युवक व्यसनाधीन होत आहे. आपल्या घराच्या उंबरठ्यावर अंमली पदार्थ येऊन ठेपले आहेत. त्यात कोणाच्याही दबालाला बळी न पड़ता सर्वांच्या विरोधात एक अधिकारी आपले कर्तव्य निष्ठेने निभावत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ ही निदर्शने करण्यात आली. 

संघटनेचे स्वप्नील नाईक म्हणाले,  सेलिब्रेटीचा मुलगा असू दे किंवा राजकीय व्यक्ती असू दे, यांच्याविरोधात एक अधिकारी आज आपले कर्तव्य निभावत आहे. म्हणून आपण त्यांच्या सोबत राहणे, आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच आम्ही समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आणि व्यसनी युवकांना पाठीशी घालणाऱ्यांच्या विरोधात या मशाली पेटविल्या आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या