मध्य प्रदेशात विमान कोसळून पायलट जखमी


भिंड  

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात बाबडी गावात  भारतीय हवाई दलाचे लढाऊ  विमान मिराज -2000 कोसळून एक पायलट जखमी झाला आहे. हे विमान शेतात पडताच जमिनीत घुसले. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. फ्लाइट लेफ्टनंट अभिलाष विमान चालवत होते. विमानात एकच पायलट होता. अपघाताची घटना सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास घडली. लोकांनी आकाशात विमानातून धूर निघताना पाहिले. विमान वेगाने खाली येत होते. धूर पाहताच एकच  गोंधळ उडाला. काही लोकांनी पॅराशूटही पाहिले. एक व्यक्ती त्याला लटकत होता.  जेथे विमान पडले तेथे मोठा खड्डा पडला. गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि  प्रशासन घटनास्थळी पोहोचले. विमान कोसळले त्या ठिकाणी काही झोपड्या आणि इतर कच्ची घरे होती. विमान कोसळून दूरवर घसरत गेल्याने घरांना आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गावकऱ्यांनी चिखल आणि पाण्याच्या मदतीने विमान आणि घरांमधील आग विझवली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या