सुजीत झावरे यांना महाराष्ट्र विकास रत्न पुरस्कार


पारनेर तालुका प्रतिनिधी 

सुजीत झावरे यांनी पारनेर तालुक्यात पाणीप्रश्नावर आजवर खुप मोठे काम उभे केलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन  त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र विकास रत्न पुरस्कार २०२१ देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा नगर शहरातील माऊली संकुल येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व मोही मूव्ही ड्रीमअर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या चेअरमन डॉ. अलका कांबळे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सुजित झावरे म्हणाले,   नदीजोड प्रकल्प सारखा राज्यात आदर्शवत असा उपक्रम राबवून तालुक्यातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवण्याचा मी प्रयत्न केला असून यापुढील काळात दुष्काळी पारनेर तालुक्यात पाणी प्रश्नावर आणखीन उत्तम काम करण्याचा माझा मानस आहे. 

 या कार्यक्रमासाठी केशव मगर उपाध्यक्ष नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा, संदीप माळी संस्थापक अध्यक्ष जनसेवा पतसंस्था सांगली, सुवर्णा जोशी नगराध्यक्षा कर्जत, मुंबई मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत नेटके, ह. भ. प. सिद्धनाथ मेटे महाराज,  नागरीक व पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या