केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारतर्फे दिवाळी बोनस


नवी दिल्ली

दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (डीए) 3%ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीसह DA 31%झाला आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए वाढवण्याचा फायदा होईल. याशिवाय काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या गतिशक्ती प्रकल्पालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली.

डीए वाढवण्याच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, 'औद्योगिक कामासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे डीए निश्चित केला जातो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून 3% ने वाढवला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारचे 47 लाख 14 हजार कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार पेन्शनधारकांना फायदा होईल. यामुळे सरकारला वार्षिक 9,488.70 कोटी रुपये खर्च येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या