विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंबंधी एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन


लिंपणगाव प्रतिनिधी 

दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर अनेक महाविद्यालये तसेच शाळा चालू झालेल्या आहेत.श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भागातून शिक्षणासाठी मुले-मुली श्रीगोंदा शहरामध्ये येत असतात,परंतु ह्या विद्यार्थ्यांची एसटीअभावी जाण्या-येण्याची गैरसोय होत आहे.विद्यार्थ्यांच्या एसटी प्रवासाचा हा प्रश्न जाणवला असता श्रीगोंदा शहरात बाहेर गावहून शिक्षणासाठी येत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीशी नागवडे यांनी चर्चा करून आगार व्यवस्थापक अहिरे साहेब यांचे याप्रश्नी लक्ष वेधले.आगार व्यवस्थापक यांना छत्रपती कॉलेज विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय नागवडे व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंबंधी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यात येईल असे आश्वासन आगार व्यवस्थापक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.

यावेळी श्रीगोंदा शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय,महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या