ग्लोबल टीचर अवार्ड-२०२१ प्रा.डॉ.महेश शेजुळ यांना जाहीर


ढोरजळगांव

जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगाव-ने संचलित, नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक प्रा.डॉ.महेश नामदेव शेजुळ यांनी गेली नऊ वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात तसेच संस्था, कॉलेज व विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण  विकासाच्या बरोबर गुणात्मक विकासाचे उल्लेखनीय कार्य केले. कोरोणाच्या  जागतिक महामारी मध्ये  कोरोना योद्धा म्हणून रुग्णांची सेवा केली या कार्याची दखल घेऊन ११० देशामध्ये दिला जाणारा ग्लोबल टीचर अवार्ड २०२१ जाहीर झाला. ऑनलाईन पद्धतीने 24 ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, संस्था अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील,संस्था- सचिव मा.आ. चंद्रशेखर घुले,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार राजश्री घुले,पंचायत समिती शेवगाव सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील,प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, प्रशासकीय अधिकारी के.वाय.नजन, मारुतराव घुले  शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, लोकनेते मारुतराव घुले महाविद्यालय, दहीगाव-ने प्राचार्य डॉ.शरद कोलते, नवजीवन विद्यालय, दहिगाव-ने प्राचार्य अशोक उगलमुगले तसेच जनता शिक्षण प्रसारक मंडळ संकुल विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक यांच्याकडून प्रा.डॉ.महेश नामदेव शेजुळ यांचे अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या