विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान


प्रतिनिधी निरगुडसर

वडगाव काशिंबेग ता.आंबेगाव येथील खंडू शंकर पिंगळे या शेतकऱ्यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले असून रेस्क्यू टीम व स्थानिक ग्रामस्थाच्या मदतीने बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील खंडू शंकर पिंगळे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार सोमवार सकाळी लक्षात आला. सोमवारी सकाळी विहिरीतून बिबट्याचा आवाज आल्यानंतर विहिरीत पहिले असता शंकर पिंगळे यांना बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी लगेचच वन विभागाशी संपर्क केला. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विभागाचे कर्मचारी रेसक्सु टिम मेंबर आदेश आगलावे ,संजय शिंदे,  सचिन दैनै, संजय डोके, व वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस व वनरक्षक पुजा कांबळे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतुन बाहेर काढत जीवदान दिले. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या