कोरोना काळात शिक्षकांचे काम वाखण्याजोगे - सत्यजित तांबे


कर्जत 

कोरोना काळात मुलांना घरच्यांनी कसे सांभाळले आहेत हे त्यांनाच माहीत असून उलट मुले शाळेत कधी जातील हा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे शिक्षक वर्ग ज्ञान देताना प्रत्येक मुलांची कशी काळजी घेतात. तसेच मुलांचा सांभाळ कसे करतात याचा प्रत्यय पालकांना चांगला आहे असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

 ते कर्जत येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि गुरूमाऊली मंडळ आयोजित शिक्षक अधिवेशनात बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, सभापती मनीषा जाधव, उपसभापती राजेंद्र गुंड, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, चेअरमन अविनाश निभोरे, शिक्षक परिषदेचे प्रवीण ठुबे, गुरूमाऊलीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ढोकरे आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत शिक्षक, त्यांचे पाल्य आणि कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या शिक्षकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, कोरोना काळात शिक्षकांचे योगदान देखील महत्वपूर्ण राहिले आहे. प्रत्येकाने आपले काम चोख बजावले आहे. शाळा बंद असल्या तरी आपल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. शिक्षण देत असताना वेळ प्रसंगी वाड्या-वस्त्यांवर जात विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले गेले. पालकांना देखील कोरोना काळात आपले पाल्य सांभाळणे जिकरीचे वाटत असताना त्याच पाल्याना शिक्षक शाळेत कसे सांभाळत असतील याची पुरेपूर प्रचिती मिळाली.  याप्रसंगी सत्यजित तांबे यांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या  शिक्षकांचा, त्यांच्या पाल्याचा सन्मान करण्यात आला.         

यावेळी शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, भाऊसाहेब ढोकरे, सभापती मनीषा जाधव, उपसभापती राजेंद्र गुंड यांच्यासह शिक्षक व शिक्षिका याची भाषणे झाली. सदर कार्यक्रमासाठी नगरसेवक सचिन घुले, ओंकार तोटे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल यांनी विशेष सहकार्य केले. कार्ययक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कारंजकर यांनी केले तर आभार प्रमोद गाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद तनपुरे, रणजित सुद्रीक, संतोष खंडागळे यांच्यासह आदी शिक्षक बांधवांनी परिश्रम घेतले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या