केंद्र आणि राज्य सरकार एकाच नाण्याच्या दोन बाजू : शेट्टी


बीड

'सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे, केंद्र सरकार आणि राज्य केंद्र सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामध्ये काही फारसा फरक नाही. कारण केंद्र सरकारने पश्चिम महाराष्ट्रात जून मध्ये महापूर झाला, पाहणी करायला आता पथक पाठवले मराठवाड्यातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी तर मार्च-एप्रिलमध्ये पथक पाठवतील सध्या अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था झालेली आहे' अशी जळजळीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. रविवारी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी बीडमधील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावरती आहोत जर राज्य सरकारने मदत केली नाही, तर शेतकरी उद्या मानगुटीवर बसेल, असा इशारा राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी दिला.

'महाविकास आघाडीवर नाराज असलो तरी उद्याच्या बंदला आमचा पाठिंबाच आहे, कोणी बंद पुकारला यापेक्षा उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. अगदी जनरल डायरने सुद्धा शरमेने मान खाली घालावी, या पद्धतीने गृह मंत्र्याच्या पुत्राने शेतकर्‍यांच्या अंगावरती गाडी घालून पाच शेतकर्‍या मारले. त्या शेतकऱ्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या