माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर


नवी दिल्ली

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते.

एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ताप नसल्याने ते पूर्वीपेक्षा जास्त प्रतिसाद देत आहे आणि हे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे लक्षण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ८९ वर्षीय डॉ.मनमोहन सिंग यांना बुधवारी संध्याकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप आहे. त्यांना चांगल्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर कार्डिओलॉजीचे प्राध्यापक डॉ.नीतीश नायक यांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. यापूर्वी मनमोहन सिंग यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्ली एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना सौम्य लक्षणे होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या