पुणे
ठाकरे सरकारच्या शेतकरी देषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबाच्या घरात दिवाळीत अंधार झाला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. असा आरोप पुण्यातील पत्रकार परिषदेत भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
या पत्रकार परिषदेला पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, धर्मेंद्र खांडरे, प्रशांत अण्णा धोटे उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यातील 55 लाख करून अधिक शेतजमीन पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात 100 लाख हेक्टर हून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत.
आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत .
जमिनीचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्या पिकाची शास्वती राहिली नाही . आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे.
वारेमाप आश्वासने पाऊस पडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत. अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी सपशेल माफी मागावी. अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
गणेश भेगडे म्हणाले, लखिम पुरच्या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या महा विकास आघडी ला राज्यात अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी द्वेष का? संकटग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूती दाखवणारा एक शब्दही मंत्रिमंडळाच्या बैठकीत का काढला जात नाही? असा सवालही गणेश भेगडे यांनी उपस्थित केला.
0 टिप्पण्या