भाजपा तर्फे लसीकरण आयोजन


जेजुरी प्रतिनिधी

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या माध्यमातून जेजुरी मधील नागरीकांसाठी जयमल्हार सांस्कृतिक भवन जेजुरी येथे एक दिवसीय विशेष कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तळेगाव नगरपालिकेचे नगरसेवक अरूणशेठ भेगडे, नगरसेवक अमोल शेटे, संतोषशेठ दाभाडे , वैभव कोतुळकर ,डाॅ.प्रसाद खंडागळे ,पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस ॲड. श्रीकांत ताम्हाणे , शलिल महाराज जगताप, दत्ता धेंडे, राजाभाऊ चौधरी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन जेजुरी भाजपा वतीने कार्याध्यक्ष गणेश भोसले , जेजुरी शहर अध्यक्ष अशोक खोमणे, जेष्ठ नेते प्रसाद अत्रे तुकाराम यादव, राजु कुदळे , चंद्रकांत झगडे यांनी केले. पुरंदर तालुका भाजपा सरचिटणीस श्रीकांत थिटे यांनी सूत्रसंचालन केले तर अलका शिंदे यांनी आभार मानले. या कँपसाठी सिरम इंस्टिट्यूट, विलु पुनावाला हाॅस्पीटल, कोअर ग्रुप संस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या