दिवाळी निमित्त ऊसतोड मजुरांना कपड्यांचे वाटप


तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या वतीने गरीब ऊसतोड मजुरांना दिवाळी निमित्त कपड्यांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. 

तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्यालगत असणाऱ्या घोलपवाडी(ता.शिरूर) व परिसरात असलेल्या शंभर गरीब ऊसतोड कामगार महीलांना साड्या व मुलांना कपडे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरने दिवाळी साजरी केली.या उपक्रमात रायकुमार बी.गुजर प्रशालेच्या सुमन जंगम,अलका सातपुते, सोनाली शेळके,सुरेखा बलाई, सोनाली हिले,जया पुजारी, अर्चना खटावकर,रत्नप्रभा देशमुख, हर्षदा परदेशी, रुपाली ढमढेरे,सरला ढमढेरे, सुवर्णा सुर्यवंशी या रायकुमार बी.गुजर प्रशालेच्या शिक्षिकांनी व प्रशांत शहाणे यांनी मोलाचे सहकार्य करत साड्या व कपडे रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर यांच्याकडे सुपूर्त केले.

यावेळी गरीब मजुरांची गरज ओळखून हा उपक्रम राबवल्याचे रोटरीचे सचिव मनोहर परदेशी यांनी सांगितले.तर अजुनही जिथे गरज असेल तिथे जाऊन आम्ही हा उपक्रम करणार आहोत असे रोटरीचे अध्यक्ष रमेश भुजबळ यांनी सांगितले., यावेळी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे, रोटरीचे संचालक राहुल चातुर, संजीव मांढरे, योगेश चव्हाण उपस्थित ओंकार भालेकर,केतन वडघुले उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या