गणेश कारखान्याचा अग्नीप्रदीपन आ विखे यांच्या हस्ते


राहाता प्रतिनिधी 

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा बँकेचे संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांचे हस्ते पार पडला.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचे गणेश युनिटचा हा सोहळा काल गणेश कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडला. यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, राहाता बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर,विखे पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वासराव कडू, संचालक दादा घोगरे, देविचंद तांबे, विखे पाटील कारखान्याचे मुख्य सल्लागार जीमी, प्रभारी कार्यकारी संचालक चारुशीला गायके, गणेश चे कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र लहारे, डॉ. धनंजय धनवटे, माजी संचालक बाबासाहेब डांगे, जालिंदर तुरकणे, यशवंत चौधरी, बापुसाहेब लहारे यांचेसह सर्व खातेप्रमुख, सभासद, कामगार उपस्थित होते.

या वेळी बॉयलरचे विधिवत पूजन गणेशचे संचालक सुदामराव सरोदे व त्यांच्या पत्नी मिनाक्षी, संचालक सुर्यकांत निर्मळ व त्यांच्या पत्नी प्रमिला, संदिपराव लहारे व त्यांच्या पत्नी जिप सदस्या कविता, जि.प.स. शाम माळी व त्यांच्या पत्नी वनिता, रावसाहेब बनसोडे व त्यांच्या पत्नी निता या दाम्पत्यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याचे पौरोहित्य मकरंद लावर यांनी केले. याप्रसंगी या दाम्पत्यांचा सत्कार आमदार विखे पाटील व माजी आमदार आण्णासाहेब म्हस्के, यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संचालक अशोकराव दंडवते, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, राम कोते,अ‍ॅड. शिवराम गाडेकर,नलिनीताई विलासराव डांगे, जे.आर.चोळके,विजयराव गोर्डे,जालिंदर निर्मळ, बाळासाहेब दाभाडे, अ‍ॅड.भाऊसाहेब शेळके, बाबासाहेब उगले, जितेंद्र गाढवे, दिलीप तेलोरे, विक्रम तुरकणे यांचेसह सभासद, कामगार उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या