मेनकाईंड कंपनीने डॉ. गायकवाड यांच्या परिवारास दिली दोन लाखांची मदत


अजनुज प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथील पशुसेवा करणारे डॉ.चंदू गायकवाड यांना पशुसेवा करताना ते कोरोना पॉजिटिव्ह आले त्यांनी कोरोनाशी झुंज दिली, पण शेवटी ती झुंज अपयशी ठरली त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांची असणारी दोन लहान मुलं, विधवा पत्नी शुभांगी त्यातच पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे असणारी उधारी मिळता मिळेना.

पण डॉ.गायकवाड यांचे कुटुंब अडचणीत असताना त्यांना आपला हातभार लागावा या भावनेतून पशुवैद्यकीय बांधवांनी आर्थिक मदत केली. आता त्यातच मेनकाईंड कंपनीने सुध्दा आपले कर्तव्य म्हणून दोन लाखांची मदत करून हातभार लावला. या दोन लाखांचा चेक कंपनीचे सेल्स मॅनेजर नंदकुमार जाधव, झोन मॅनेजर संग्राम मोहिते, मॅनेजर धनंजय राऊत, प्रशांत बारगुजे, डॉ.अशोक देसाई यांच्या हस्ते शुभांगी  यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

खरं तर सर्व पशुवैद्यकीय बंधूंनी एकजुट दाखवून आपल्या व्यवसायीक बांधवांवर आलेला अत्यंत वाईट प्रसंगातून सावरण्यासाठी केलेला चांगला उपक्रम आणि त्यात मेनकाईंड कंपनीने दाखवलेला दानशूरपणा याचा आम्हाला रास्त अभिमान वाटतो.

- डॉ. दत्तात्रय बनसोडे, सचिव, पशुवैद्यकीय व्यवसाय संघटना,  श्रीगोंदा


"पशुवैद्यकीय डॉक्टर पशुसेवा करताना काही प्रसंग ओढवतात त्यात शेताच्या बांधावरून जाताना तसेच रस्त्यावर अपघात झाला तर मेनकाईंड कंपनीने पशुसेवा करणाऱ्या डॉक्टर कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ती मागणी तत्वता मान्य करु असे आश्वासन कंपनीने दिले. कंपनीने दिलेल्या मदतीच्या हातभारा बद्दल आभार मानतो.

- डॉ.संतोष जठार काष्टी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या