छावनी परिषद मिनी मॅरेथॉन स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद


नगर  प्रतिनिधी 

छावनी परिषद आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त छावनी परिषद आयोजित या स्पर्धेचे उदघाटन छावनी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार व कँम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. गौतम बुध्द जॉगिंग पार्क येथून सुरू झालेल्या या स्पर्धेत काळे , खेडकर,बोरूडे, बारस्कर,घोडके, भंडारी, झिने यांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकावले.

स्पर्धेला सकाळी सात वाजता सुरूवात झाली. सकाळच्या गुलाबी थंडीत धावण्याचा आनंद शहर व भिंगारमधील युवकांसह जेष्ठ नागरिकांनी घेतला.

 स्पर्धेकरिता बँक आँफ महाराष्ट्र व नगर क्लबचे विशेष सहकार्य लाभले.

स्पर्धेकरिता सुहास धीवर,रमेश वाघमारे,भरत थोरात,प्रविण शिर्के,विठ्ठल काळे यांनी पंच म्हणून तर योगेश बोरुडे,अमोल कुलट, सुभाष भारुड, महेश भगत, संजय घाडगे, संजय हजारे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरविंद कुडिया यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या