पोलीस कोठडीत आशिष मिश्रा याला डेंग्यूची लागण


लखनऊ  

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी सध्या कारावासात असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा  याला डेंग्यूची लागण झाली आहे. मिश्रा याला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आशिष मिश्रा पोलीस कोठडीत  होता. त्याला शनिवारी संध्याकाळी कारागृहाच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. चार शेतकऱ्यांसह आठ व्यक्ती उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी या ठिकाणच्या हिंसाचारात 3 ऑक्टोबर रोजी ठार झाल्या आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आशिष मिश्रावर आहे. या हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत आशिष मिश्रासह 13 जणांना अटक करण्यात आली आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या