आर्यन खानला आजही तुरुंगातच राहावे लागणार


मुंबई 

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला आजही तुरुंगातच राहावे लागणार. जामीन अर्जांवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या म्हणजेच गुरुवारी निर्णय होणार आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आज न्यायालयात आपला जबाब दाखल केला आहे. याचबरोबर, NCB ने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनालाही विरोध केला. आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे.

आर्यन खानवर कॉन्ट्राबँडच्या खरेदीसाठी वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही, तर मर्चंटकडून अमली पदार्थदेखील जप्त करण्यात आले आहे. तसेच, परदेशातील व्यवहारांशी संबंधित तपास केला गेला पाहिजे आणि तो केलाही जात आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या