आरती बडे नीट परीक्षा उत्तीर्ण


ढोरजळगाव 

शेवगांव तालुक्यातील ढोरजळगावने येथील शेतकरी कुटुंबातील प्रगतशील शेतकरी शहादेव बडे यांची सुकन्या आरती शहादेव बडे ही नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट परीक्षा कृषी विद्या विभाग या विषयातून 92.33 गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

 आरती बडे हिने पदवी शिक्षण सोनई कृषी महाविद्यालय नेवासा तर पदव्युत्तर पदवी एम ,एसी चे शिक्षण कोल्हापूर कृषी महाविद्यालयात पूर्ण केले आहे. पदव्युत्तर पदवी पूर्ण करत असतानाच नीट परीक्षेचा जोमाने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात तीने हे उत्तुंग यश संपादन करून ग्रामीण भागातील मुलींसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. तीच्या या यशात तीला कुटुंबांचे,  प्राध्यापक, यांचे मार्गदर्शक असुन  भविष्यात महाराष्ट्र कृषी लोकसेवा आयोगाद्वारे कृषी अधिकारी पदावर सेवा करण्याचा मानस तिने अरती हीनेे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. तिच्या या यशाबद्दल तीचे ढोरजळगांव व परिसरातून अभिंनदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या