उद्घाटनापूर्वीच दफनभूमीच्या भिंती कोसळल्या


टाकळी ढोकेश्वर प्रतिनिधी

येथे उद्घाटनापूर्वी पडल्या मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या कामातील  भिंती. सदर ठेकेदार अशोक वाळुंज याच्यावर कारवाई करण्याची ग्रामपंचायत सदस्य- सुग्रमी कादर हवालदार यांची मागणी.

आदर्श गाव टाकळी ढोकेश्वर येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी च्या कंपाउंड साठी अल्पसंख्यांक निधीतून 25 लाख रुपये मिळाले होते  टाकळी ढोकेश्वर येथील दफनभूमीच्या कामासाठी अशोक वाळुंज या कॉन्ट्रॅक्टरला सदर काम  देण्यात आले होते. मुस्लिम बांधवांनी निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याने वारंवार त्याला कल्पना देऊनही आज त्या ठिकाणी काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. आज त्या ठिकाणची परिस्थिती पाहता उद्घाटन होण्यापूर्वीच काम पडायला लागलेले आहे नवीन काम एवढं मजबूत आहे की जोराचा वारा जरी आला तरी भिंती पडतील अशी अवस्था आज त्या ठिकाणी आहे .

 जवळपास 25 लाख रुपये एवढा मोठा निधी खर्चूनही आज त्या ठिकाणी कोणतेही पक्के काम झालेले नाही 

तरी प्रशासनाने या कामाची पाहणी करावी व सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार अशोक वाळुंज याच्या वर चौकशी करून कडक कारवाई करावी व त्याला शासनाच्या काळया यादीत टाकावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुग्रामी कादर हवलदार यांनी केले आहे.


सदरील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून या कामाची सखोल चौकशी होऊन कंत्राटदारांवर कारवाई व्हावी .

यापूर्वीही या कंत्राटदारावर ग्रामसभेत ठराव घेऊन एकही काम त्याला देणार नसल्याचं सांगण्यात येऊन सुद्धा त्याच कंत्राटदाराला  टेंडर मिळतं तरी कसं. यात नक्की काहीतरी अर्थपूर्ण संबंध असण्याची शक्यता 

- शिवाजी खिलारी, माजी सरपंच टाकळीढोकेश्वर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या