कर्जत
प्रभागातील
असणाऱ्या अनेक नागरी प्रश्नांना आ रोहित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद
देत आपल्या निधीतून ते मार्गी लावत आहे. कर्जत शहराच्या सर्वांगीण
विकासासाठी आ. पवार कटीबद्ध असून सध्या त्यांनी नगरपंचायत हद्दीत अनेक
विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण पार पाडले आहे. राजकारणात ८०% समाजकारण
आणि फक्त २०% राजकारण त्यांचे सूत्र असल्याने आगामी काळात मतदारसंघाचा
चेहरा-मोहरा बदलण्याचा त्यांचा मानस आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते
भास्कर भैलुमे यांनी केले. ते कर्जत येथे प्रभाग क्रमांक १५ सिद्धार्थनगर
येथील नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी आ रोहित पवार यांच्या हस्ते सदर शुद्ध पिण्याचे पाणी केंद्राचे
उदघाटन पार पाडले.
यावेळी आ रोहित पवार
यांनी भाषण न करता प्रभागातील प्रत्येक नागरिकांसोबत सवांद साधत परिसरातील
अडी-अडचणी याबाबत चर्चा केली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील
शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आ पवार यांनी
कर्जत-जामखेड तालुक्यात विकासाचे राजकारण उभारले आहे. त्यात प्रत्येक
राजकीय नेता आ पवार यांना सहकार्य करीत असून आगामी काळात कर्जत-जामखेड
मतदारसंघ राज्यासह देशात आपली वेगळी ओळख निर्माण उभारेल असा विश्वास सर्व
पदाधिकार्याना आहे. जनता देखील आ रोहित पवार यांच्या विकासकामांवर खुश असून
त्यांना भरभरून प्रेम देत आहे. यावेळी भास्कर भैलुमे यांनी प्रभागातील
विविध समस्या आ पवार यांच्याकडे विशद करीत त्यावर काम करण्याची मागणी रोहित
पवार यांच्याकडे केली. यासह प्रभागात केलेल्या विकासकामाबद्दल आभार देखील
व्यक्त केले.
यावेळी नामदेव राऊत, प्रा विशाल
मेहत्रे, प्रसाद ढोकरीकर, नगरसेविका मनीषा सोनमाली, डॉ शबनम इनामदार,
रज्जाक झारेकरी, सतीश भैलुमे, नितीन तोरडमल, विनोद पवार, संजय भैलुमे, बाबा
भिसे, बबन थोरात, हबीब कुरेशी, पीर महमंद कुरेशी, संतोष आखाडे, किरण
भैलुमे, अस्लम कुरेशी, डॉ मनोहर पडागळे, राकेश काकडे, अजीज सय्यद आदी
उपस्थित होते.
0 टिप्पण्या