अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई

चालकास अटक, १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत


बारामती 

बिगरपरवाना चार ब्रास वाळू चोरून वाहतूक करणाऱ्याला वाळू चोरट्याला वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. रोहित संजय रायते (वय.२१ वर्ष. ( रा.सणसर,ता.इंदापूर, जि.पुणे ) असे ताब्यात घेण्यात आल्याचे नाव आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार सदर आरोपीवर  वालचंदनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७९,पर्यावरण अधिनियम कलम ४,गौण खनिज उत्खनन अधिनियम १९५७ सुधारित कलम ४,२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोतोंडी येथील पेट्रोलपंपा जवळून अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रॅक येत असल्याची माहिती मिळाली असता,वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तेथे पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या हायवामधून बेकायदेशीरपणे बिगरपरवाना अंदाजे चार ब्रास वाळू चोरून वाहतूक करत असताना मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेत,आरोपीच्या ताब्यातील दहा लाखांचा हायवा व यातील चोरून आणलेली ४० हजार किंमतीची वाळू असा एकूण १० लाख ४० हजार रूपये  किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस कर्मचारी खंदारे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या