घोरपडे यांची जीवन गौरव पुरस्कारसाठी निवड


जेजुरी प्रतिनिधी 

जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयातील आदर्श कला शिक्षक योगेश शंकर घोरपडे यांची उडाण फाउंडेशन बुलढाणा तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार 2021 साठी निवड झाली आहे. उडाण फाउंडेशन बुलढाणा तर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक उपक्रम शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून जिजामाता हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज जेजुरी येथील उपक्रमशील कृतिशील विद्यार्थी प्रिय कला शिक्षक यांना निवड पत्राद्वारे निवड समितीकडून कळविण्यात आले आहे. उडाण फाउंडेशनचे अध्यक्ष रिझवान खान आणि सचिव विशाल गुजर सर यांनी सरांचे शैक्षणिक सामाजिक उपक्रम कार्यास निवड पत्र देऊन सन्मान पात्र केले आहे . योगेश घोरपडे यांची आज पर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने जिजामाता विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्ष आनंदीकाकी जगताप , सचिव आमदार संजय जगताप, संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, उपाध्यक्ष संजय जाळीद्रे, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. एम एस जाधव, सहसचिव दत्तात्रय गवळी, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे यांनी अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या