Breaking News

दौंड मध्ये राष्ट्रवादीपक्षाला मोठा धक्का

बादशहाभाईनी केला राम राम


दौंड 

दौंड मधील राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते ,दौंड नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि जेष्ठ नगर सेवक बादशहा शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम केला आहे.

दौंड शहरात गेली तीस पस्तीस वर्ष राजकारणात सातत्याने काम करणारा एक सरळ मार्गी परंतु निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे.

खासदार सुळे याच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्याबैठकीत दौंडच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड मत मांडली, यामुळे सुळे या नाराज झाल्या. तर याच बैठकीत माजी आमदार रमेश थोरात यांनी शेख याना पुढे  बोली दिले नाही. हा आपला अपमान असल्याचे पत्रकार परिषदेत सांगत शेख यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम केला आहे.

शेख याच्या पक्ष सोडण्यामुळे राष्ट्रवादीपक्षाला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे.

आगामी भूमिके बाबत आपण आपल्याबाजूचे नगर सेवक आणि करकर्ते यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहे. यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे शेख यांनी सांगितले आहे.


No comments